मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत गोगटे वाळके कॉलेजचा डंका…

इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत श्रद्धा हेवाळकर मुंबई विद्यापीठात द्वितीय…

बांदा/प्रतिनिधी
मुंबई विद्यापीठाच्या ५५ व्या युवा महोत्सवात विद्यापीठीय अंतिम फेरीत इंग्रजी वक्तृत्व या स्पर्धेत येथील गोगटे – वाळके महाविद्यालयाची विद्यार्थिनी श्रद्धा बुद्धभूषण हेवाळकर (तृतीय वर्ष – कला) हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.
मुंबई विद्यापीठाच्या सांस्कृतिक विभागामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये विद्यापीठाच्या एकूण अकरा विभागामधून सुमारे ४४ स्पर्धक या अंतिम फेरीत सहभागी झाले होते. या स्पर्धकांमधून तिने हे यश संपादन केले आहे. त्यामुळे आंतरविद्यापीठीय पातळीवरील संघात निवड होण्यासाठी ती पात्र ठरली आहे. तिच्या या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ बांदाचे अध्यक्ष डी. बी. वारंग, सचिव एस. आर. सावंत, खजिनदार टी. एन. शेटकर, कार्यकारी मंडळ सदस्य सुभाष मोर्ये, प्रेमानंद देसाई, भगवान देसाई, प्रेमानंद नाडकर्णी, मंदार कल्याणकर, शीतल राऊळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर व सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचा-यांनी तिचे अभिनंदन केले आहे. तिला प्रा. डॉ. दत्तगुरू जोशी, प्रा. अनिल शिर्के, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. एन. डी. कार्वेकर यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो :-
पानवळ महाविद्यालयात श्रद्धा बुद्धभूषण हेवाळकर हिचे अभिनंदन करताना संस्थेचे अध्यक्ष डी बी वारंग. सोबत इतर.

You cannot copy content of this page