डेगवे बाजारवाडी येथे टेम्पो साईटपट्टीवरील मातीत रुतला…

⚡बांदा ता.१५-: बांदा – दोडामार्ग रस्त्यावर डेगवे- बाजारवाडी येथे विलास केसरकर यांच्या दुकानासमोर आयशर टेम्पो बाजुपट्टीवरील मातीत रुतला. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. ही घटना आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. गेल्या चार दिवसातील हा दुसरा अपघात आहे.
सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. या दोन्ही बाजुपट्टी पावसाळ्यात कमकुवत झाल्या असून वारंवार अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी या बाजुपट्टीचे काम तात्काळ करावे अशी मागणी स्थानिकातून होत आहे.

You cannot copy content of this page