नगरिकानी मोठ्या संख्येने राहावे उपस्थित…
मालवण दि प्रतिनिधी
संयुक्त राष्ट्रसंघा (UNO) ने १७ सप्टेंबर हा दिवस जागतिक स्वच्छ सागरी किनारा दिवस म्हणून जाहीर केला असल्याने मालवणवासियांचा सर्वात मोठा आर्थिक स्त्रोत असलेला समुद्र किनारा स्वच्छ व सुंदर असणे हे आपले कर्तव्य आहे. यासाठी सर्व मालवणवासियांनी १६ सप्टेंबर रोजी सकाळी ६.३० ते ८.०० या वेळेत मालवण बंदर जेटी येथे स्वच्छता उपक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहन पंकज पेडणेकर मोबा नंबर ९४२२३७३०८९, संजय गावडे, राजन कामत यांनी केले आहे
