जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला भव्य मडका फोड मोर्चा

हजारोंचा प्रतिसाद;राजस्थान मधील विद्यार्थी मृत्यूचे पडसाद

सिंधुदुर्गनगरी ता १५
मानवतेला काळीमा फासणाऱ्या, क्रूरतेचा कळस गाठणाऱ्या अनेक घटना देशभरात घडत आहेत. यात
मडक्यातील पाणी पिल्याच्या रागातून तिसरीत शिकणाऱ्या राजस्थान मधील इंद्रकुमार मेघवाल या विद्यार्थ्याला उच्चजातीय शिक्षकाने मारहाण केल्याने त्याचा झालेला मृत्यू, यासह अनेक घटना अलिकडील काळात घडल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही जातीय अत्याचाराचे प्रकार घडत असतात. त्याला आळा बसावा, या उद्देशाने जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीसह सर्व बौद्धधर्मिय, चर्मकार समाज, मुस्लिम संघटनांनी मिळून ‘जातीय प्रवृत्तीचा मडका फोड मोर्चा’ आज गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयार काढला..आणि
मानवतेला काळीमा फासणाऱ्या, क्रूरतेचा कळस गाठणाऱ्या देशभरात घडत असलेल्याअनेक घटनांचा निषेध नोंदविला.

आज(गुरुवारी) सकाळी ११.३० वा. ओरोस फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडून जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चामध्ये परिवर्तनवादी विचारसरणीचे बांधव हजारोंच्या संखेने सहभागी झाले होते. मोर्चेकऱ्यानी या घटनेचा निषेध करीत घोषणाबाजी देत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.
मोर्चेकरी सकाळी ११ वा. ओरोस येथील शिवपुतळ्याकडे एकत्रित आले तेथे शिवपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाला .जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाल्यानंतर मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. या ठिकाणी संघटनेच्या विविध पदधिकाऱ्यानी मोर्चाला संबोधित करताना तीव्र शब्दात अन्यायाबाबत निषेध व्यक्त केला . तर जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. त्यांच्याशी झालेल्या चर्चेची माहिती मोर्चेकऱ्यांना सांगितली.

यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर, कास्ट्राईबचे जिल्हाध्यक्ष संदीप कदम, सत्यशोधक संघटनेचे नेते ॲड.सुदीप कांबळे, चर्मकार समाज उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुजीत जाधव, सरचिटणीस चंद्रसेन पाताडे, भारतीय चर्मकार समाज संघटनेचे जिल्हा सेक्रेटरी चंद्रकांत पवार, वंचित आघाडीचे जिल्हा महासचिव प्रमोद कासले, वंचितचे जिल्हा युवक आघाडी अध्यक्ष रोहन कदम, कणकवली तालुकाध्यक्ष संजय जाधव, उपाध्यक्ष संजय तांबे, चर्मकार संघटनेचे महानंदा चव्हाण, कास्ट्राईबचे किशोर कदम आदी सहभागी झाले होते.

You cannot copy content of this page