पोलिस निरीक्षक विजय यादव यांच्याकडे भाजपची मागणी
मालवण दि प्रतिनिधी
आमदार वैभव नाईक यांनी मालवण नगरपरिषदेच्या पिंपळपार येथील व्यायामशाळेत शासन निधीतून २५ लाख रुपये किमतीचे व्यायामाचे साहित्य दिल्याच्या खोट्या बातम्या प्रसारित करत जनतेची फसवणूक केली या खरेदी केलेल्या व्यायाम साहित्यात भ्रष्टाचार केला ही बाब उघड झाली आहे. या घटनेचा आपण गांभीर्याने विचार करून आमदार नाईक यांच्यावर मालवण शहरवासीयांच्या फसवणुकी बाबत कलम ४२० नुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणारे
माजी खासदार निलेश राणे यांच्या लेटर हेडवरील निवेदन मालवण तालुका भाजपच्या वतीने मालवण पोलीस निरीक्षक विजय यादव यांना गुरुवारी देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदन पत्रात म्हटले आहे, मालवण पिंपळपार येथील व्यायामशाळेत शासन निधीतून आम नाईक यांनी साहित्य दिल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते त्यानुसार निलेश राणे यांनी व्यायामशाळेची पहाणी केली असता या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे व्यायाम साहित्य नसल्याची बाब निदर्शनास आली होती त्यानुसार आज भाजप पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना हे निवेदन दिले
यावेळी भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, दीपक पाटकर, सुदेश आचरेकर, बाबा परब, अजिंक्य पाताडे, चारूशीला आचरेकर, महेश मांजरेकर, राजू परुळेकर, ललित चव्हाण, निनाद बांदेकर, संतोष इब्रामपूरकर, प्रमोद करलकर, महेश सारंग, जॉमी ब्रिटो, अक्षय कदम यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
