तुमचं अनधिकृत बांधकाम दाखवतो ते पाडण्याची तयारी ठेवा अन्यथा राजीनामा द्या

बांधकाम सभापती ॲड. विराज भोसले यांचे सुशांत नाईक, कन्हैया पारकर यांना थेट आव्हान

⚡कणकवली ता.१३-: सत्ताधारी म्हणून आमचे कोणतेही अनधिकृत बांधकाम कणकवली शहरात नाही. जर हिम्मत असेल तर समोर या व आमचं बांधकाम पाडा. नसेल तर तुमचं अनधिकृत बांधकाम दाखवतो ते पाडण्याची तयारी ठेवा अन्यथा राजीनामा द्या असे थेट आव्हान कणकवली नगरपंचायतीचे बांधकाम समिती सभापती ॲड. विराज भोसले यांनी दिले. काल आमच्यावर आरोप करत होते ते सुशांत नाईक व कन्हैया पारकर यांची शहरात अनधिकृत बांधकामे किती आहेत ते मी दाखवून देईन. जर सुशांत नाईक यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी मुख्याधिकारी दालनात यावे दिवस, वेळ ठरवा माझी तयारी आहे असे थेट आव्हान विराज भोसले यांनी दिले.
कणकवली शहरातील पोयेकरवाडी येथील घरकुलासंदर्भात विरोधी नगरसेवकांनी केलेली तक्रार धादांत खोटी आहे. हे घर माझे वडील सुभाष भोसले यांनी 1996 मध्ये कुंदा भास्कर पोयेकर यांच्याकडून खरेदी खताने विकत घेतले. याचं रजिस्टर खरेदीखत आहे. सदर खरेदी खताने घेतलेले घर हे ज्या व्यक्तीच्या मालकीच होता त्यांच्या नावाने खरेदीखत केलं. मात्र फ्लॅट किंवा घर खरेदी घेत असताना त्या खालची जमीन खरेदी घेतली जात नाही. या घर नंबर 106 चे रीतसर खरेदीखत होऊन त्याची मालकी सुभाष भोसले यांचे आहे. हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. गेली 25 वर्ष ते बांधकाम व्यवसायात कार्यरत आहेत. या बांधकामाशी माझा कोणताही संबंध नाही असेही विराज भोसले यांनी सांगितले. असे असताना विरोधी नगरसेवकांनी नगरपंचायत निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे राजकीय आरोप केल्याचे सांगत बांधकाम सभापती विराज भोसले यांनी त्याला प्रत्युत्तर दिले. विरोधी नगरसेवकांनी काल केलेल्या आरोपांवर प्रत्युत्तर देताना पत्रकार परिषदेत विराज भोसले म्हणाले,

कणकवली शहरात नगरसेवक सुशांत नाईक व स्वीकृत नगरसेवक कन्हैया पारकर यांच्या अनधिकृत बांधकामां संदर्भात मी रीतसर मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्याकडे तक्रार देणार असून, या अनधिकृत बांधकामांवर कारवाईची मागणी करणार असल्याचे विराज भोसले यांनी सांगितले. सुशांत नाईक यांचे कणकवली नरडवे चौकात जे कॉम्प्लेक्स आहे त्याला ओसी दिलेली नसताना देखील अनेक दुकाने त्यामध्ये चालू आहे. ही दुकाने कशी चालू केली? असा सवाल करत ॲड. विराज भोसले यांनी या कॉम्प्लेक्सवर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले. तर स्वीकृत नगरसेवक कन्हैया पारकर हे राहत असलेल्या बिल्डिंग मधील दुसरा माळा पूर्णतः अनधिकृत असून, गेली अनेक वर्ष ते असेसमेंट न करता या बिल्डिंगमधील दुसऱ्या माळ्यावर राहत आहेत. या दोन नंबर माळ्यावरील मोजमापे घेण्यासाठी नगरपंचायत कर्मचारी गेल्यावर त्यांना दादागिरी करतात असा आरोप ॲड. भोसले यांनी केला. कन्हैया पारकर यांच्यामध्ये जर हिम्मत असेल तर त्यांनी देखील मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये यावे त्यांच्या अनधिकृत मजल्याची यादी माझ्याकडे असून आमने-सामने या असे खुले आव्हान ॲड. भोसले यांनी दिले. लोकांवर आरोप करण्यापेक्षा अगोदर स्वतःचे तपासून पाहा टोला ॲड. भोसले यांनी लगावला. जर श्री. पारकर हे राहत असलेला दुसरा माळा अनधिकृत ठरला तर ते राजीनामा देतील काय? असा सवाल देखील ॲड. भोसले यांनी केला. सत्तेचा गैरवापर कशाला म्हणतात ते नाईक व पारकर यांच्या अनधिकृत बांधकामांकडे पाहिल्यावर समजते. नाईक यांनी सत्तेचा वापर करून घेत आपल्या बांधकामाना अभय दिले. तर श्री. पारकर यांचे भाऊ नगराध्यक्ष व सरपंच असताना बांधलेल्या इमारतीवरील एका माळ्याचा असेसमेंट केला नाही यालाच सत्तेचा गैरवापर म्हणतात असा टोला ॲड. भोसले यांनी लगावला. गोरगरीब जनता कणकवली नगरपंचायतच्या असेसमेंटची फी रीतसर भरत असताना स्वीकृत नगरसेवक राहिलेले कन्हैया पारकर मात्र गेले काही वर्ष त्यांचे भाऊ सरपंच असताना बांधलेल्या बिल्डिंगमधील दोन नंबर मजल्याचा नगरपंचायतचा कर बुडवत आहेत असा आरोप ॲड. भोसले यांनी केला. नगरपंचायतच्या सत्तेचा गैरवापर नगराध्यक्ष समीर नलावडे व आम्ही केव्हा केला नाही. म्हणूनच नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याजवळ कणकवली शहरवासीयांनी 2008 पासून सलग सत्ता दिली. सत्तेचा गैरवापर कुणी केला हे यावरून दिसून येते. असा टोला देखील ॲड. भोसले यांनी लगावला. कणकवलीत पोयेकरवाडी येथे म्हसकर घराजवळ पडलेल्या खड्ड्यात चिऱ्याची कुप घातली व तेथेच बाजूला असलेल्या मातीचे डंपर तेथून गेल्यामुळे माती रस्त्यावर पडल्याने झालेला चिखल या संदर्भात स्थानिक नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर नगरपंचायतचा बंब रस्त्यावरील माती साफ करण्याकरिता पाठवला. हा बंब कुणाच्या वैयक्तिक कामाकरता पाठवला नव्हता. तसेच सत्तेचा गैरवापर करणे कशाला म्हणतात तर सत्तेचा गैरवापर करून गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या बिल्डिंगच्या दोन नंबर मजल्याचा असेसमेंट न करणे व कणकवली शहरात आपली अनधिकृत बांधकामे करणे व त्यांना अभय मिळवणे याला सत्तेचा गैरवापर म्हणतात हे देखील नाईक आणि पारकर यांनी लक्षात ठेवावे. नगराध्यक्ष समीर नलावडे हे कुणाच्या चुकीच्या कामाला पाठीशी घालत नाही मात्र सुशांत नाईक यांना घर बांधत असताना त्यांचे सहिस्सेदार असलेल्यांनी परवानगी दिली नाही. त्यावेळी परवानगी द्या अस नगराध्यक्षांनी सांगितलं होत. तसेच आमदार वैभव नाईक यांच्या घराच्या मागील बाजूस मंजूर झालेल्या गटाराच्या कामाला देखील नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी ठराव दिला. याला पाठीशी घालणं असं म्हणतात असा टोला ॲड. भोसले यांनी लगावला.

You cannot copy content of this page