कणकवलीत शिवसेना शिंदे गटाची पोलीस निरीक्षकांकडे मागणी
⚡कणकवली ता.१३-: राजापूर येथील गोवळ गावातील नरेंद्र जोशी या व्यक्तीने आमचे नेते व आमचे शिवसैनेकांचे प्रेरणास्थान महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री ना.उदय सामंत यांना जाळून जीवे मारण्याची धमकीवजा ईशारा दिला आहे. हा विषय गंभीर स्वरूपाचा असून एखाद्या महाराष्ट्र राज्याच्या मंत्री महोदयांना व्यासपीठावरून खुलेआम धमकी देत असेल, तर या वक्त्याव्यावरून असे दिसून येथे की मंत्री महोदयांना संरक्षण वाढवून ताबडतोब अशा व्यक्तीची पार्श्वभूमी तपासून अशा व्यक्तीवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने कणकवली पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी शिवसेना शिंदे गटाचे शेखर राणे, दामू सावंत, अनिल खोचरे, अतुल दळवी, सुनील हरमळकर, निलेश तेली, दिपक राऊत, दिलीप घाडीगावकर आदींनी हे निवेदन दिले आहे.
