जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते करण्यात आला प्रदान
ओरोस ता.१३-:
.प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्यावतीने राबवली जाते. या योजने अंतर्गत तुळस येथील अपघाती निधन झालेले मयत महेश वसंत साटम यांची वारस पत्नी ममता महेश साटम यांना सिंधुदुर्ग जिल्हा बॅक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते दोन लाख रक्कमेचे विमा पत्र बँकेच्या होडावडा शाखेत सुपूर्द करण्यात आले.
यावेळी होडावडा शाखेचे शाखाव्यवस्थापक सुनिल जाधव व बँक कर्मचारी यावेळी उपस्थित होते. वेंगर्ले तालुक्यातील तुळस गावातील महेश सावंत यांचे विहीरीत पडून अपघाती निधन झाले होते. महेश यांच्या नांवे सिधुदुर्ग जिल्हा बँकेमार्फत प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अंतर्गत विमा उतरविण्यात आला होता. सोमवारी महेश यांच्या वारस असलेल्या पत्नी ममता यांना जिल्हा बॅक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते दोन लाख रक्कमेचे विमा पत्र सुपूर्द करण्यात आले.
