वैश्यवाडा येथील बाप्पा चरणी ५ हजार ५५६ मोदकांचा नैवेद्य अर्पण

⚡सावंतवाडी ता.१३- : शहरातील वैश्यवाडा हनुमान मंदिर येथील २१ दिवसांच्या सार्वजनिक बाप्पा चरणी तब्बल ५ हजार ५५६ मोदकांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला.

वैश्यवाडा हनुमान मंदिर येथे श्री हनुमान मंदिर उत्सव समिती वैश्यवाडा, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सावंतवाडीतर्फे २१ दिवसांच्या सार्वजनिक बाप्पा चरणी सामुदायिक अथर्वशीर्ष पठण व सहस्त्रमोदक नैवेद्य अर्पण सोहळा पार पडला. उकडीचे मोदक, तळणीचे मोदक, खवा मोदक आदी विविध प्रकारचे हजारो मोदक बाप्पाला अर्पण करण्यात आले. यावेळी मोदकांचा नैवेद्य अर्पण करत नवस देखील पूर्ण करण्यात आले. यावेळी गणपतीची पुजा, महाआरती पार पडली. गणेशभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

You cannot copy content of this page