गोगटे वाळके कॉलेज मध्ये ऑनलाईन सॉफ्ट स्किल्स ट्रेनिंग चे आयोजन ..

बांदा /प्रतिनिधी
बांदा-पानवळ येथील गोगटे- वाळके महाविद्यालय आणि आयआयटी मद्रास एनपीटीईएल यांच्या संयुक्त सहकार्याने निवडक विद्यार्थ्यांसाठी आँनलाईन ‘सॉफ्ट स्किल्स ट्रेनिंग’ चे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण शिबिर १७ सप्टेंबर पर्यंत दररोज होणार आहे.
या प्रशिक्षण शिबिरात नोकरीसाठी मुलाखत कौशल्य, वैयक्तिक बायोडेटा तयार करणे, इंग्रजी संवाद करणे, शिष्टाचार, विविध नोकरी संकेतस्थळे यासंबंधीची कौशल्ये शिकवली जातील. अंतिम दिवशी प्रत्येक विद्यार्थ्याची प्रारूप मुलाखत चाचणी होईल. भारतातील अग्रगण्य अशा आयआयटी संस्थेच्या तज्ञाद्वारे प्रशिक्षण दिले जाईल. गोगटे वाळके महाविद्यालय व एनपीटीईएलच्या विविध आँनलाईन अभ्यासक्रमासाठी मान्यताप्राप्त संस्था आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर व ट्रेनिंग समन्वयक डॉ. अभिजीत महाले यांच्या प्रयत्नातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच अशा स्वरूपाचे ट्रेनिंग आयोजित करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page