दीड लाख रुपयांचे नुकसान;मुसळधार पावसामुळे कहर
⚡बांदा ता.१३-: मुसळधार पावसात वाफोली येथील प्रकाश नारायण परब यांच्या राहत्या घराची भिंत कोसळून दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने घरातील व्यक्ति याठिकाणी नसल्याने मोठा अनर्थ टळला.
बांदा परिसरात गेले ४ दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. वाफोली येथील परब यांच्या घराची भिंत कोसळल्याने घरातील वस्तू व सामानाची नासधूस झाली. यामध्ये त्यांचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. बांदा तलाठी वर्षा नाडकर्णी यांनी नुकसानीचा पंचनामा केला.
