अंगारक संकष्ट चतुर्थी निमित्त सामुदायिक अथर्वशीर्ष पठण व सहस्त्र मोदक नैवेद्यार्पण सोहळा

वैश्यवाडा येथील हनुमान मंदिर उत्सव समिती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने आयोजन

⚡सावंतवाडी ता.१३- : अंगारक संकष्ट चतुर्थी निमित्त सालाबादप्रमाणे यावर्षी वैश्यवाडा येथील हनुमान मंदिर उत्सव समिती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने आज सामुदायिक अथर्वशीर्ष पठण व सहस्त्र मोदक नैवेद्यार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे आहे.

यनिमित्त सकाळी ६.३० वा. महापूजा, सकाळी ७.०० वा. सामुदायिक अर्थवशीर्ष पठण, दुपारी १.०० वा. महाआरती, श्रीं’ ना सहस्त्रमोदक नैवेद्यार्पण सोहळा, रात्री ९.०० वा. भजन कार्यक्रम होणार आहेत. ज्या भाविकांना नैवेद्यासाठी मोदक अर्पण करावयाचे असतील त्यांनी ते दुपारी १.०० च्या अगोदर मंदिरात आणून द्यावेत. तरी सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने सामुदायिक अर्थवशीर्ष पठणाला उपस्थित रहावे तसेच जास्तीत जास्त मोदक ‘श्रीं’ ना नैवेद्यासाठी अर्पण करुन ‘श्रीं’ च्या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन वैश्यवाडा येथील हनुमान मंदिर उत्सव समिती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page