⚡मालवण ता.१२-:
मालवण कुंभारमाठ येथील प्रगतशील आंबा व्यावसायिक यांना नुकताच विद्यार्थी विकास अकादमी महाराष्ट्र व कर्नाटक यांच्यावतीने देण्यात येणारा राष्ट्रीय पातळीवरील ऍग्रो आयडॉल पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ना. दीपक केसरकर यांच्याकडून फोंडेकर यांचा सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
ना. दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी येथील कार्यालयात आयोजित गुरुसेवा सन्मान पुरस्कार सोहळ्यात उत्तम फोंडेकर यांना सन्मानित करण्यात आले. ऍग्रो आयडॉल सारखा महत्वाचा पुरस्कार आपल्या जिल्ह्यातील व्यक्ती पटकावते ही जिल्हा वासीयांसाठी अभिमानास्पद बाब आहे असे कौतुकोद्गार ना. केसरकर यांनी काढत फोंडेकर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
