शैक्षणिक प्रगतीवर गावाचा विकास अवलंबून

गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांचे प्रतिपादन

वैभववाडी संजय शेळके
शिक्षण घेत असताना व्यावसायिक अभ्यासक्रम तसेच तांत्रिक ज्ञान विद्यार्थ्यांनी घेतले पाहिजे. शैक्षणिक प्रगतीवरच गावचा विकास अवलंबून असतो. प्रत्येक विद्यार्थ्याने आत्मियतेने शिकले पाहिजे. नवनवीन प्रयोग, संशोधन केले पाहिजे. ध्येय निश्चिती बरोबर मी शिस्तप्रिय नागरिक जे बनणार असा निश्चय प्रत्येकाने केला पाहिजे. असे प्रतिपादन गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांनी व्यक्त केले.

करुळ येथील माध्यमिक विद्यालयात वैभववाडी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनचे उद्घाटन पार पडले. यावेळी व्यासपीठावर गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे, मुख्याध्यापक दीपक घाटगे, केंद्रप्रमुख संतोष गोसावी, विस्तार अधिकारी अशोक वडर, शिक्षक प्रतिनिधी डी. एस. पाटील, तानाजी कांबळे, माजी पं. स. सदस्य बाळा कदम, तंटामुक्ती अध्यक्ष रमेश कोलते, विश्वास सावंत, बाळा पांचाळ, अनिता पांचाळ, दीपा पाटील, रामचंद्र शिवगण, संदीप तुळसकर, शरद नारकर व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.

श्री परब म्हणाले, विज्ञानामुळे भारताची प्रगती गतीने होत आहे. मर्यादित लोकसंख्या असलेल्या देशाची प्रगती देखील विज्ञानामुळेच झाली आहे. आत्मनिर्भर भारतचे मुख्य उद्देश दुसऱ्यावर अवलंबून न राहणे असाच आहे. त्यामुळे शिक्षण घेत असताना व्यावसायिक अभ्यासक्रम तसेच तांत्रिक ज्ञान विद्यार्थ्यांनी घेतले पाहिजे. आत्मियतेने विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे पाहिले पाहिजे असे सांगितले. तसेच नागरिकांनी प्लास्टिकचा वापर टाळणे आवश्यक आहे. थर्माकोल पर्यावरणाला घातक आहे. प्लास्टिक स्वतःपासून टाळण्याची सुरुवात करा असे परब यांनी सांगितले. गटशिक्षणाधिकारी शिनगारे म्हणाले, आजचे विद्यार्थी देशाचे आदर्श नागरिक आहेत. शालेय जीवनापासून त्यांनी ध्येय निश्चित करून वाटचाल केली पाहिजे असे सांगितले.

डी. एस. पाटील, श्री. तुळसकर, बाळा कदम यांनी मार्गदर्शन केले. करुळ विद्यालयाचे मुख्याध्यापक दीपक घाटगे यांनी सर्वांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन, प्रतिमापूजन व स्वागत गिताने करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शिक्षक नवनाथ सगरे, शिक्षिका अर्चना पाटील यांनी मानले. यावेळी तालुक्यातील शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ विज्ञान प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करताना गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे, मुख्य घाडगे छाया संजय शेळके वैभववाडी

You cannot copy content of this page