उंबर्डेतील इयत्ता नवित शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू

⚡वैभववाडी ता.१२-: तालुक्यातील उंबर्डे मेहबुबनगर येथील शहीदराज नियाज फरास, वय १४ या इयत्ता नवित शिकणाऱ्या मुलाचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. मामाच्या घरी विजेचे बटण सुरू करीत असताना रविवारी (दि.११ )रात्री ८ वा.हा प्रकार घडला. कणकवली येथे खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.

शहीदराज हा रविवारी सायंकाळी येथील मशिदीत नमाज पडून मामाच्या घरी काही कामानिमित्त गेला होता. यावेळी मामाच्या घरातील लाईट लावण्यासाठी तो लोखंडी जिन्यावर चढला. दरम्यान लाईटचे बटण सुरु करीत असतानाच त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. यात तो जिन्यावर थेट खाली जमिनीवर कोसळला. त्याला उंबर्डे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्याठिकाणी प्राथमिक उपचार करून त्याला वैभववाडीतील ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने तेथील डॉक्टरांनी पुढे नेण्यास सांगितले.कणकवली तेथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तेथे त्यांची प्राणज्योत मालवली.

You cannot copy content of this page