देवगड
गणेशोत्सव काळात आम.नितेश राणे यांनी तारामुंबरी येथील २१ दिवसाच्या श्री खवळे महागणपती तसेच देवगड पोलीस स्थानक सार्वजनिक गणरायाचे दर्शन घेतले.या वेळी श्री खवळे महागणपतीच्या वतीने सूर्यकांत खवळे यांनी त्यांचा स्वागत सत्कार करण्यात आले.तसेच देवगड पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे यानी स्वागत केले.याव्यतिरिक्त आम.नितेश राणे यांनी तालुक्यातील ठिकठिकाणच्या श्रीचे दर्शन घेतले यावेळी त्यांचे समवेत भाजप जिल्हा ,तसेच तालुका पदाधिकारी उपस्थित होते.ठिकठिकाणी आम.नितेश राणे याचे गणेशभक्तांनी स्वागत केले.
आ नितेश राणे यांनी खवळे महागणपती, पोलिसांच्या गणपतीचे घेतले दर्शन
