जेष्ठ संचालक अजित गोगटे यांच्याहस्ते भूमिपूजन
देवगड
देवगड तालुका खरेदी विक्री संघाच्या पेट्रोल पंप नुतनीकरण आधुनिकीकरण भूमिपूजन शुभारंभ माजी आम.तथा जेष्ठ तज्ञ संचालक अजित गोगटे यांच्या शुभहस्ते विधिवत पूजनाने स्थानिक ग्रामोपाध्ये अनिल जोशी यांच्या पौरोहित्याखाली पार पडला.या प्रसंगी चेअरमन जयदेव कदम,व्हॉइस चेअरमन बाबा कोकरे,ऍड प्रकाश बोडस,संचालक रवी तिरलोटकर,संतोष फाटक,चंद्रकांत पाळेकर, रामदास अनुभवणे,ग्रेसीस फर्नाडिस,शैलेंद्र जाधव,इंडियनऑइल सेल्स ऑफिसर वरूण मीना,तसेच व्यवस्थापक कौस्तुभ जामसंडेकर,पेट्रोल पंप व्यवस्थापक मिलिंद देशपांडे मक्तेदार अतुल आंबेरकर व अन्य सदस्य कर्मचारी सदस्य उपस्थित होते.
या नुतनीकरण आधुनिकीकरण यात प्रामुख्याने सुसज्ज कॅनोपी,सिएनजी सुविधा,इलेक्ट्रिक चार्जिंग सुविधा,नायट्रोजन हवा,कॉफी हाऊस, अद्ययावत प्रसाधनगृह व तसेच अन्य सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत.
