Headlines

विना अपघात सेवा बजावणाऱ्या सहा बस चालकांचा ह्युमन राईट्स संघटनेतर्फे करण्यात आला सत्कार

मालवण दि प्रतिनिधी मालवण एसटी आगारातील विना अपघात सेवा बजावणाऱ्या सहा बस चालकांचा मालवण तालुका ह्युमन राईट्स संघटनेतर्फे प्रजासत्ताक दिनी सत्कार करण्यात आला. मालवण येथील टोपीवाला हायस्कुल मध्ये प्रजासत्ताक दिनी आयोजित शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात मालवण तालुका ह्युमन राईट्स संघटनेतर्फे हा सत्कार कार्यक्रम पार पडला. तहसीलदार अजय पाटणे, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, पोलीस निरीक्षक सोनू ओटवणेकर यांच्या हस्ते बस चालकांना सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये गणेश वेंगुर्लेकर, संतोष सावजी, अनंत भाटकर, सुनील धुरी, गुरुनाथ घाडीगांवकर, सुदाम पुजारे या बस चालकांना सन्मानित करण्यात आले. यावेळी ह्युमन राईट्स संघटनेचे मालवण तालुका अध्यक्ष सुधीर धुरी, उपाध्यक्ष राजेशकुमार लब्दे, सचिव महेश मयेकर, उपसचिव हार्दिक महाजन, महिला संघटक अश्विनी परुळेकर, निरीक्षक संदेश फाटक, संपर्क प्रमुख प्रमोद कांडरकर, सदस्य प्रथमेश बिरमोळे, जिल्हा सचिव किशोर महाजन, टोपीवाला हायस्कुलचे मुख्याध्यापक मिलिंद अवसरे आदी व इतर उपस्थित होते. फोटो मालवण एस टी आगारातील विना अपघात सेवा सहा चालकांचा सत्कार तहसीलदार अजय पाटणे यांच्या हस्ते करण्यात आला त्याचे छायाचित्र

You cannot copy content of this page