सुदैवाने डंपर चालक बचावला
*💫मालवण दि.२८-:* आंबडोस येथून गोव्याच्या दिशेने चिरे घेऊन जाणाऱ्या डंपर चालकाचा डंपरवरील ताबा सुटल्याने कासारटाका येथील दरीत डंपर कोसळल्याची घटना काल बुधवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली या अपघातात सुदैवाने कोणी जखमी झाले नाही मालवण -कुडाळ मार्गावरील धामापूर कासारटाका घाटीतील उतारावर आंबडोस वरुन गोव्याच्या दिशेला चिरे वाहतूक करणाऱ्या डंपरचा ( MH07 – AJ- 1191) काल दिनांक २७ जानेवारी रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने डंपर रस्त्याच्या बाजूला खोल दरीत पलटी होऊन कोसळला. सुदैवाने रस्त्याकडेला असलेल्या झाडाना डंपर अडकल्याने मोठ्या अपघातातून चालक सुखरूप बचावला. या अपघाताची खबर समजताच चौके ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेतली व मदतकार्य केले तसेच या मार्गावरुन जाणारे मालवणचे नगरसेवक यतीन खोत व शिल्पा खोत यांनी अपघाताची चौकशी केली. अपघाताचे प्रथमदर्शनी गाभीर्य पाहता १०८ आँम्बुलन्स बोलवण्यात आली. मात्र अपघाताची वस्तुस्थिती पहाता डंपरचा चालक सुदैवाने वाचला अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली.
