जेष्ठ साहित्यिक डॉ महेश केळुसकर, जयंत पवार यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन

मालवण दि प्रतिनिधी
मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगणच्या वतीने जेष्ठ साहित्यिक डॉ. महेश केळुसकर आणि जयंत पवार या साहित्यिकांच्या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा दिनांक ११ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता बॅ. नाथ पै सेवांगण मालवण येथे ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या हस्ते होणार आहे.

मालवणी मुलूखातील कवी डॉ. महेश केळुसकर यांच्या ‘अधांतर अंधारात’ या कविता संग्रहाचे तसेच नाटककार जयंत पवार यांच्या ‘माझं घर’ या नाटकाच्या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी शब्दालय प्रकाशनच्या सुमती लांडे, संध्या नरे- पवार, डॉ. महेश केळुसकर हे उपस्थित राहणार आहेत. या प्रकाशन सोहळ्यास साहित्य प्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन बॅ. नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष ऍड. देवदत्त परुळेकर यांनी केले आहे.

रंगनाथ पठारे यांच्याशी मुक्त संवाद

बॅ. नाथ पै जन्म शताब्दी निमित्त नगरवाचनालय वेंगुर्ला आणि बॅ. नाथ पै सेवांगण मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने वर्तमान, राजकीय, सामाजिक आणि साहित्य संस्कृती विषयक आस्थेचे प्रश्न हा ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्याशी मुक्त संवादाचा कार्यक्रम सोमवार दि. १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता वेंगुर्ला नगर वाचनालय येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी श्री. पठारे यांच्याशी डॉ. महेश केळुसकर, संध्या नरे- पवार, सुमती लांडे आणि ऍड. देवदत्त परुळेकर हे संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन नगर वाचनालय वेंगुर्ला चे कार्याध्यक्ष अनिल सौदागर आणि बॅ. नाथ पै सेवांगण मालवणचे कार्याध्यक्ष दिपक भोगटे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page