नांदगाव ग्रामस्थांनी रोखलेली वाहतूक पोलिसांनी केली सुरळीत

⚡कणकवली ता.०७-:
नांदगाव महामार्गालगत पुरेशी गटार व्यवस्था व नैसर्गिक नाले व्यवस्था न केल्‍याने पावसाचे पाणी नांदगाव बिडयेवाडी परिसरातील काही घरांमध्ये पावसाचे पाणी घुसले आहे. त्‍यामुळे संतप्त झालेल्‍या नागरिकांनी एकत्र येऊन महामार्ग रोको आंदोलन सुरू केले होते.अखेर,पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी नागरिकांशी चर्चा करत महामार्गावरील वाहतूक सुरुळीत केली आहे.

महामार्ग चौपदरीकरण करताना महामार्ग ठेकेदाराने चुकीच्या पद्धतीने गटारांचे बांधकाम केले. त्‍यामुळे गेली दोन वर्षे पावसाळ्यात नांदगाव परिसरातील घरांमध्ये पावसाने पाणी जाऊन नुकसान होत आहे. याबाबत येथील सामाजिक कार्यकर्ते नागेश मोरये यांनी यंदाच्या स्वातंत्र्यदिनी उपोषण केले होते. त्‍यावेळी महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्‍यांनी येथील पाण्याचा प्रश्‍न सोडविण्याची ग्‍वाही दिली होती. मात्र,ठेकेदाराकडून प्रत्‍यक्षात काम झाले नाही. आज होत असलेल्‍या मुसळधार पावसाचा फटका येथील घरांना बसला आहे. घरांमध्ये पाणी गेल्‍याने येथील नागरिकांनी एकत्र येऊन महामार्ग रोको आंदोलन केलं.मात्र,पोलीस फौज फाट्यासह दाखल झाल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

यावेळी माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती नागेश मोरये,उपसरपंच नीरज मोरये,अशोक बिडये व नांदगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page