चौकशी करण्याची मनसेची मागणी
⚡वैभववाडी ता.०७ संजय शेळके-: वैभववाडी शहरातील मटण शाॅप मधून विकलेल्या मटणात अळी व किडे आढळून आले आहेत. संबंधित मटण विक्रेत्याची चौकशी करुन त्याच्यावर कारवाई करावी. अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेच्यावतीने तहसिलदार व मुख्याधिकारी नगरपंचायत वैभववाडी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
यावेळी मनसे उपजिल्हाप्रमुख दया मेस्ञी, तुषार चिले, रुपेश वारंग, ज्ञानेश्वर मोरे, विनोद विटेकर, संजय नारकर, जयराम परबते आदी उपस्थित होते.
