रस्त्याअभावी रुग्णांना नेण्यासाठी वापरावा लागतोय स्ट्रेचर

वागदे सावरवाडी ग्रामस्थांची कैफियत ; रस्ता देण्याची केली मागणी

⚡कणकवली ता.०७-: वागदे गाव कणकवली शहरालगत असूनही रस्ता नसल्याने वागदे सावरवाडीतील एखादी व्यक्ती आजारी पडल्यास तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी स्ट्रेचरचा आधार घ्यावा लागत असल्याचे दिसून येत आहे सावरवाडी येथे जाण्यासाठी असलेले पायवाट अत्यंत अरुंद असल्याने ग्रामस्थांवर ही वेळ आली असल्याचे काही ग्रामस्थांनी सांगितले ग्रामस्थांची अडचण दूर करण्यासाठी वागदे सावरवाडीचे सुपुत्र उदयोजक प्रमोद पालव यांनी स्ट्रेचर भेट देत दातृत्व दाखविले मात्र रस्त्याअभावी स्ट्रेचर द्यावा लागतो हे दुर्दैव म्हणावे लागेल.

वागदे सावरवाडीतील ग्रामस्थ हायवे नं. ६६च्या बाजूला राहूनही साधी चालायला पायवाट नाही, वाडीतील कोणीही व्यक्ती आजारी पडल्यास वाडीत वाहन जायला रस्ता नाही. गंभीर रुग्णांना गोधडीतून अनेक अडथळे पार करत रस्त्यावर आणावे लागते. अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत.वाडीतील लोकांची ही गंभीर समस्या ओळखून सामाजिक बांधिलकीतून आपल्या आईवडिलांच्या स्मरणार्थ स्टीलचे स्ट्रेचर वागदे सावरवाडीचे सुपुत्र उदयोजक प्रमोद पुंडलिक पालव ( राजू पालव) योनी सावरवाडीतील ग्रामस्थांजवळ सुपूर्द केले .
सिंधुदुर्ग जिल्हातील बरीच गावे डोंगराळ आहेत. त्यांच्या वाड्या, वस्त्यांपर्यंत रस्ते जाऊ शकतात तर वागदे सावरवाडी अगदी कणकवली शहराच्या बाजूला लागून असूनही तिथे जायला साधा रस्ता असू नये. त्यांच्यावर स्ट्रेचर घेण्याची वेळ यावी? यासारखे दुदैव नाही. या कामी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून त्या ग्रामस्थांना न्याय देणे गरजेचे आहे. शहरालगत राहूनही त्यांच्यावर स्ट्रेचर वापरण्याची वेळ यावी हे लोकप्रतिनिधींना भूषणावह नाही,अशी प्रतिक्रिया वागदे सावरवाडी येथील ग्रामस्थ सुनिल पालव,पांडू सावंत,गुरुप्रसाद पालव, नंदकुमार तेजम,शेखर गावडे यांच्यासह ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

You cannot copy content of this page