चाकरमानी गणेशभक्ताची एसटीला पसंती
⚡देवगड ता.०७-: गौरी गणपती उत्सवाकरिता आलेल्या चाकरमानी गणेशभक्तांकरिता विजयदुर्ग आगार सज्ज झाले असून,परतीच्या प्रवासाकरीता सुमारे ५५ जादा गाड्याचे आरक्षण फुल्ल झाले आहे.
यात सर्वाधिक बोरिवली मार्गावर,तसेच मुंबई सेंट्रल,अर्नाळा या मार्गावर जादा गाड्या दि.६ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर या कालावधीत चाकरमानी गणेश भक्तांना घेऊन परतीच्या प्रवासाला निघाल्या आहेत.याव्यतिरिक्त नियमित रातराणी प्रवासी फेरीही प्रवाशांच्या सेवेसाठी नियमित पणे सुरू आहेत
विजयदुर्ग आगारात या वर्षी ५५ जादा प्रवासी फेऱ्या चाकरमानी गणेशभक्तांना घेऊन रवाना होणार आहेत. अधिक गाड्यांचा ताफा विजयदुर्ग आगाराने परतीच्या प्रवासाला सज्ज ठेवला आहे.कोकणात गौरी गणपती विसर्जनानंतर चाकरमानी मुंबईकडे रवाना होत असल्याने दि.६ सप्टेंबर रोजी सर्वाधिक २१ जादा गाड्यांचे आरक्षण,त्याखालोखाल दि.७सप्टेंबर रोजी २० जादा गाड्या आरक्षण या व्यतिरिक्त अन्य दिवशी जादा प्रवासी फेऱ्या सोडण्यात येत आहेत.लांबपल्ल्याच्या ,पुणे,
पणजी या मार्गावरही नियमित प्रवासी सेवा देण्यात येत आहे.चालू वर्षी विजयदुर्ग आगाराने चाकरमानी गणेश भक्तांकरिता अधिकाधिक सुविधा पुरविल्याने प्रवासी वर्गात कौतुक होत आहे.
सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक विभागीय कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली आगार
व्यवस्थापक वैभव पडोळे, सहा. वाहतूक निरीक्षक,एल.डी. पवार,वहातुक नियंत्रक व्ही. एन.राणे,राकेश तेली,. कार्यशाळा हेड मॅकेनिक, रवि राणे,सहा. कारागीर रामा एडके, सहा. डी. पी.नार्वेकर,लेखाधिकारी अशोक ठाकरे,वाहन परीक्षक,तसेच सर्व कर्मचारी,चालक वाहक अधिकाधिक सेवा प्रवासी वर्गाला देण्यासाठी विशेष मेहनत घेत आहेत.
