कणकवलीत मुसळधार पावसाचा धुमाकूळ

⚡कणकवली ता.०७-: कणकवली तालुक्यासह शहरात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने आपले उग्ररूप कायम दाखविले दुपारी तीन वाजल्यापासून विजांच्या कडकडासह आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली सायंकाळी उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता.

अचानक आलेल्या पावसामुळे काही जणांची तारांबळ उडाली. पण मागील बरेच दिवस दडी मारलेल्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे परतीच्या पावसाला सुरुवात झाली असल्याचे चित्र दिसत आहे. आज सायंकाळी 4 च्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह विजा चमकून पावसाला जोरदार सुरुवात झाली. त्यामुळे वातावरणात देखील गारवा निर्माण झाला

You cannot copy content of this page