गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुट्टे पैसे उपलब्धते बाबत आचरा व्यापारी संघटनेने वेधले बँकांचे लक्ष

⚡मालवण ता.२६-: गणेशोत्सवात बाजारात मोठ्या प्रमाणात होणारा सुट्टे पैशांच्या तुटवड्याच्या दृष्टीने बँकांनी सुटे्ट पैसे उपलब्ध करुन देण्याबाबत आचरा व्यापारी संघटनेतर्फे आचरे गावातील तीन बँकांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले.

गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत ग्राहकांची वाढत्या वर्दळीमुळे मोठ्या प्रमाणात सुट्टया पैशांचा तुटवडा जाणवतो. यातच एटीएम मधून पाचशे रुपये, दोन हजार रुपये नोटांचीच उपलब्धता होत असल्याने खरेदी साठी येणाऱ्या ग्राहकांना सुटे्ट पैसे देताना दुकानदारांची दमछाक होते. यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बँकांमध्ये सुटे्ट पैसे उपलब्ध करुन मिळण्यासाठी आचरा व्यापारी संघटनेतर्फे बॅंक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बॅंक, सिंधुदुर्ग बॅंकेच्या शाखाधिकारी यांना निवेदन देत लक्ष वेधले. यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, जयप्रकाश परुळेकर , माणिक राणे, पंकज आचरेकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page