⚡मालवण ता.२६-: कुडाळ रेल्वेस्टेशन- आचरा ही वस्तीची एसटी बस फेरी पूर्ववत करावी, अशी मागणी महाविद्यालयीन, माध्यमिक विद्यार्थी व अन्य प्रवाशांनी एसटीच्या कणकवली विभाग नियंत्रक यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्या नंतर ही बसफेरी पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. असून ही बस कांदळगाव रामेश्वर मंदिर येथे सकाळी ६.३० वाजता येणार आहे.
सदर बस फेरी कोरोना काळात बंद केल्यानंतर अद्यापपर्यंत सुरू झाली नव्हती. यामुळे विद्यार्थी, रेल्वे प्रवासी, नोकरदार व ग्रामस्थ यांची गैरसोय झाली होती. ही बस फेरी पूर्ववत सुरू करून गैरसोय दूर करावी, अशी मागणी कांदळगाव येथील उमेश कोदे, सिद्धार्थ कदम, सतीश कदम, राजीव कदम, कुंदा तांबे, संजय कदम, ओमकार कांदळकर, उदय परब, शीतल परब, गणेश पाताडे, प्रवीण परुळेकर आदींनी केली होती. ग्रामस्थांच्या मागणी नंतर ही बस फेरी पुन्हा सुरू करण्यात आली आहे
