मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव प्रशालेत रानभाज्या प्रदर्शन व विक्री उपक्रम संपन्न

उपक्रमाला विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

⚡सावंतवाडी ता.२५सहदेव राऊळ-: मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव प्रशालेत दुर्मिळ नैसर्गिक पिक असलेल्या रानभाज्या प्रदर्शन व मर्यादित विक्री उपक्रम पार पडला. उपक्रमाला शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


या उपक्रमाचे उदघाटन शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष मनोहर राऊळ यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रद्धा सावंत, पर्यवेक्षक एम. बी. फाले सर, शिक्षक ओमप्रकाश तिवरेकर सर, एन. एस. गोसावी मॅडम, बी. बी. सावंत सर, गोल्याळकर सर, व्ही. आर. सावंत सर, सावंत भोसले मॅडम, पी. एम. मातोंडकर मॅडम, एस. एस. परुळकर मॅडम, ए. जी. मोर्ये मॅडम, एस. आर. कारीवडेकर सर आदी उपस्थित होते.

या प्रदर्शन व विक्री उपक्रमात प्रशालेच्या सर्व शिक्षक- शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व इयत्ता पाचवी ते आठवी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी झाले होते. या उपक्रमात शेवगा. पेवा, एकपान, अळू, तेर, कुड्याच्या शेंगा, टायकाळा, दिंडा, घोटवेल, कुरडू, सुरण, आदी विविध प्रकारच्या रानभाज्यांचा समावेश होता. यावेळी सहभागी विद्यार्थी- विद्यार्थीनींनी प्रदर्शनासाठी आणलेल्या भाज्यांची प्रशालेतील शिक्षक-शिक्षिका- शिक्षकेतर कर्मचारी यांनी खरेदी केली. यावेळी मुख्याध्यापिका, शिक्षक व शिक्षिका यांनी विद्यार्थी- विद्यार्थीनीना रानभाज्या मार्गदर्शन केले.

You cannot copy content of this page