एक ठार तर दोघे जख्मी; दुचाकीला वाचविताना झाला अपघात…
बांदा /प्रतिनिधी
कोल्हापूरहुन गोव्याच्या दिशेने भरधावं वेगात जाणाऱ्या आलिशान मोटारीला मुंबई -गोवा महामार्गांवर बांदा -सटमटवाडी येथे भीषण अपघात होऊन मोटारीतील मनीष कुमावत (वय २७, रा. इंदोर मध्यप्रदेश ) याचा जागीच मृत्यू झाला. तर मोटारितील दोघेजन जखमी झालेत. समोरून येणाऱ्या दुचाकीला वाचविण्याच्या नादात मोटारीला अपघात झाल्याचे स्थानिकांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती अशी कि, मोटारितील तिघेजण गोव्यात पर्यटणासाठी जातं होते. महामार्गवर सटमटवाडी येथे समोरून येणाऱ्या दुचाकीला वाचविण्याच्या नादात मोटार विरुद्ध दिशेच्या लेनवर कोसळून अपघातग्रस्त झाली. दुभाजाकात लोखंडी फलकाला गाडी धडकल्याने गाडीचा चक्कचूर झाला. यामध्ये गाडीच्या मागील सीटवर बसलेल्या मनीष कुमावत हा गाडीच्या बाहेर रस्त्यावर फेकला गेल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. तर मोटारितील शशांक दुबे व मेघा कारवा यांना किरकोळ दुखापत झाली.
