गणेश चतुर्थीपूर्वी सार्वजनिक बांधकाम अखत्यारित असणाऱ्या रस्त्यावरील खड्डे बुजवा

नारायण उर्फ बबन राणे यांची अनामिका चव्हाण यांच्याकडे मागणी

⚡सावंतवाडी ता.२५-: गणेश चतुर्थीपूर्वी सार्वजनिक बांधकाम अखत्यारित असणाऱ्या रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजविण्यात यावेत, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम अभियंता अनामिका चव्हाण यांच्याजवळ पंचायत समिती माजी सदस्य नारायण उर्फ बबन राणे यांनी निवेदनाद्वारे केली.

यावेळी गजानन नाटेकर, संजय माजगावकर, दत्ताराम बांदेकर, मंगलदाय देसाई’, अशोक दळवी, एकनाथ हळदणकर, प्रकाश बिद्रे, बापू कोठावळे विश्वास घाग, जगन्नाथ गावडे, पांडुरंग बंदिवडेकर, सदाशिव कदम, शैलेश मेस्त्री आदी उपस्थित होते
या निवेदनात असे म्हटले की, कोकणातील महत्त्वाचा मानला जाणारा गणेशोत्सव अगदी जवळ येवून ठेपला आहे. या काळात ग्रामीण भागातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या रस्त्यावर एसटी वाहतूक व अन्य वाहने मोठ्या प्रमाणात ये-जा करत असतात. अशावेळी रस्त्यावर पडलेल्या या खड्ड्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे.त्यामुळे याबाबत आपल्या स्तरावर योग्य ती तात्काळ कार्यवाही करून गणेश चतुर्थीपूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावेत, तसेच रस्ता दुतर्फा असलेली झाडी तात्काळ मारण्यात यावी. जेणेकरुन अपघात होणार नाहीत या. कार्यवाही न झाल्यास होणाऱ्या घटनेस आपण जबाबदार रहाल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे

You cannot copy content of this page