कणकवलीतील प्रतिष्ठित व्यापारी श्रीकृष्ण उर्फ आप्पा सापळे यांचे निधन

⚡कणकवली ता.२५-: सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष , कणकवली येथील प्रतिष्ठित व्यापारी श्रीकृष्ण उर्फ आप्पा रामचंद्र सापळे (७३) यांचे बुधवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले.


शिक्षण प्रसारक मंडळ कणकवलीचे सदस्य तसेच भालचंद्र महाराज संस्थांनचे सदस्य होते. आप्पा नावाने ते सर्वत्र परिचित होते. सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. कणकवली शहरात त्यांचे स्वत:चे किराना मालाचे दुकान आहे. कणकवली बाजारपेठेतील महापुरुष मित्रमंडळाच्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असायचा. त्यांचे वैश्यवाणी समाजाच्या कार्यातही मोठे योगदान होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी, भाऊ, भावजय, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. मंदार सापळे यांचे ते वडिल तर दत्ता सापळे यांचे ते बंधू होत. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विद्यामंदिर हायस्कूल व कणकवली कॉलेजमध्ये श्रद्धांजली वाहत शाळा व कॉलेज सोडण्यात आले.

You cannot copy content of this page