हळवल शिवडाव मार्गावर वाढलेली झाडी व वीज वाहिन्यांवरील वेली तोडा

लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवलची मागणी

⚡कणकवली ता.२५-: गणेशोत्सवापूर्वी हळवल शिवडाव मार्गावर वाढलेली झाडी व वीज वाहिन्यांवरील वाढलेल्या वेली तोडण्याबाबत लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल परबवाडी यांच्यावतीने कार्यकारी अभियंता, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व कार्यकारी अभियंता महावितरण यांना निवेदन देण्यात आले.


हळवल शिवडाव मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झाडी वाढली आहे. त्यामुळे या मार्गावर अपघात होण्याची भीती असल्याने ह्या झाडी गणेशोत्सवापूर्वी तोंडुन मार्ग मोकळा करावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. त्यासोबत या भागातील वीज वाहिन्यांवर वेलींचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गणेशोत्सव काळात वीज जाण्याचे प्रकार वाढतात यावर तोडगा म्हणून गणेशोत्सवापूर्वी वीज वाहिन्यांवरील वेली तोडाव्यात अशा आशयाचे निवेदन कार्यकारी अभियंता महावितरण येथे देण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष लवू परब, उपाध्यक्ष भरत गावडे, सचिव दीपेश परब,उमेश परब, दीपक राऊळ, दशरथ परब, प्रशांत गावडे, विकास गावडे, शिवा राणे, शैलेश परब, हर्षल परब, नितेश राऊळ आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page