प्रभाग ९ मध्ये सहा ठिकाणी सिमेंट बँचेस

मनोज मोंडकर यांचा स्वखर्चातून प्रयत्न

मालवण : (प्रतिनिधी)

मालवण येथील मनोज मोंडकर यांच्या वतीने नागरिकांच्या मागणी नुसार मालवण शहरातील प्रभाग क्र.९ मध्ये ६ ठिकाणी सिमेंट बेंचेस स्व:खर्चातून बसवण्यात आले आहेत.

नागरिकांच्या मागणीनुसार आडवण गणेश कुंड परिसरात तीन ठिकाणी, मारुती मंदिर हिंदळेकरवाडा मार्ग याठिकाणी १ तर तानाजी नाका याठिकाणी १ असे सहा बेंचेस मनोज मोंडकर यांनी आपल्या स्व: निधीतून उपलब्ध केले आहेत. हे बेंचेस आवश्यक त्या ठिकाणी बसवण्यात आले आहेत. यावेळी मनोज मोंडकर यांच्यासह मोहन मराळ, पांडु चव्हाण, प्रसाद आडवणकर, किशोर गावकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page