माजी मुख्याध्यापिका नंदिनी देसाई यांचे निधन

⚡मालवण ता.२५-: देवबाग येथील रहिवासी व तेथील न्यू इंग्लिश स्कूलच्या माजी मुख्याध्यापिका श्रीमती नंदिनी नामदेव देसाई (वय ७०, पूर्वाश्रमीच्या वासंती विश्वनाथ तारी) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नात असा परिवार आहे. देसाई यांनी भंडारी हायस्कूल येथे शिक्षिका म्हणून सेवा बजावली होती. त्यानंतर त्या देवबाग न्यू इंग्लिश स्कूलमध्ये रुजू झाल्या. गणित व विज्ञान विषयाचे त्या अध्यापन करायच्या. १९९९ ते २००९ या कालावधीत त्यांनी न्यू इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका म्हणून काम केले होते. माजी विद्यार्थ्यांकडून त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून श्रद्धांजली वाहण्यात आली.

You cannot copy content of this page