युवा सेनेच्या पदाधिकारी निवडीचा धडाका सुरूच

कोकिसरे विभागप्रमुखपदी रोहित पावसकर तर लोरे विभागप्रमुखपदी गणेश पवार

⚡कणकवली ता.२२-: कणकवली विधानसभा मतदारसंघात युवा सेनेची घोडदौड सुरूच असून, युवासेनेच्या पदाधिकारी नियुक्तीचा धडाका युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी सुरू ठेवला आहे. नुकत्याच वैभववाडी तालुक्यात झालेल्या शिवसेनेच्या बैठकांमध्ये युवा सेनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.

या मध्ये कोकिसरे जि. प युवासेना विभाग प्रमुख पदी रोहित पावसकर तर लोरे युवा सेना विभाग प्रमुख पदी गणेश पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार वैभव नाईक व शिवसेना नेते सतीश सावंत, अतुल रावराणे यांच्या प्रमुख उपस्थितीत युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी या निवडी जाहीर केल्या. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी तालुकाप्रमुख मंगेश लोके, रोहित रावराणे, स्वप्नील धुरी, सदा सरवणकर आदि उपस्थित होते.

You cannot copy content of this page