⚡कणकवली ता.२२-:
कणकवली शहरातील नगरपंचायत चे कार्यक्षम सत्ताधारी नगरसेवक व राष्ट्रवादीचे नेते अबिद नाईक यांच्या माध्यमातून कणकवली शहरातील शिवाजीनगर, परबवाडी, मधील महिलांना आज शेवटच्या श्रावण सोमवार निमित्त कुणकेश्वर दर्शन चे मोफत आयोजन करण्यात आले.
दोन टेम्पो ट्रॅव्हलर मधून कुणकेश्वर दर्शनासाठी आज सकाळीच या वार्डातील महिला रवाना झाल्या. राष्ट्रवादीचे नेते अबीद नाईक हे नेहमीच सामाजिक उपक्रमांमध्ये कार्यरत असतात. श्रावण सोमवार निमित्त त्यांनी या वर्षी देखील आपल्या वार्डातील महिलांना मोफत कुणकेश्वर दर्शन सहलीचे आयोजन केल्याने या वार्डातील महिलांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. अबीद नाईक यांच्या उपस्थितीत या दोन टेम्पो ट्रॅव्हलर्स कुणकेश्वरला रवाना झाल्या.
