माजी नगरसेविका दिपाली भालेकर यांचा उपक्रम..
⚡सावंतवाडी ता.२२-: माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त संजू परब मित्र मंडळातर्फे धान्य वाटप करण्यात आले. यावेळी माजी नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या हस्ते हे धान्यवाटप करण्यात आले.
यावेळी भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे, माजी नगरसेवक आनंद नेवगी, मा. नगरसेविका दिपाली भालेकर, भाजप शहर उपाध्यक्ष दिलीप भालेकर यांनी माजी नगराध्यक्ष संजू परब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व उपरलकर पाटेकर चरणी त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना केली.
यावेळी भाजप मंडळ अध्यक्ष अजय गोंदावळे, माजी नगरसेवक आनंद नेवगी, मा. नगरसेविका दिपाली भालेकर, भाजप शहर उपाध्यक्ष दिलीप भालेकर, किसान मोर्चा सरचिटणीस अजय सावंत, चराठा ग्रामपंचायत सदस्य अमित परब, बुथ अध्यक्ष सचिन साटेलकर, बापू सुभेदार, विनायक कांडरकर, रवी नाईक, एकनाथ पेडणेकर, भाई गावडे इत्यादी उपस्थित होते. सर्वांचे आभार जय भालेकर यांनी मानले.
