कॅथॉलिक पतसंस्थेची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

सभासदांना १४ टक्के लाभांश जाहीर

⚡सावंतवाडी ता.२२ : कॅथॉलिक अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसा.लि. सावंतवाडी या संस्थेची २८वी वार्षिक सर्वसाधारण सभा काल नवसरणी केंद्र सावंतवाडी येथे संपन्न झाली.

संस्थेने आजपर्यंत २८ वर्षाची व्यवसायाची कटिबध्दता राखत सहकारातील कार्याची अखंडता कायम राखली आहे. आर्थिक क्षेत्रात कमालीची स्पर्धात्मक परिस्थिती असूनही स्थापनेपासूनची ऑडीट वर्ग ‘अ’ ची परंपरा कायम राखली आहे.
बँकिंग क्षेत्रातील सध्याची आव्हाने व ग्राहकांच्या गरजा लक्षात घेता बँकाप्रमाणेच वेगवेगळया नेट बँकिंगच्या सेवा संस्थेने ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहेत.

अलीकडेच संस्थेने एटीएम सेवा सुरू केली आहे तसेच व्यापारी वर्गाची गरज लक्षात घेऊन क्युआर कोड सेवा देखील सुरू केली आहे. संस्थेला सलग चौथ्यावर्षी संपुर्ण कोकण विभागातून बँको या संस्थेकडून ब्लू रिवन अवार्ड मिळाला आहे, ही बाब आम्हा सर्वांना अभिमानाची आहे.

आता संस्थेचे एका विशाल वटवृक्षात रूपांतर झाले आहे आणि संस्था २०० कोटी ठेवींकडे वाटचाल करत आहे आणि यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य अपेक्षीत आहे असे मा. अध्यक्ष पी. एफ. डॉन्टस यांनी सांगितले. मार्च २०२२ अखेर संस्थेला एक कोटी पासष्टलाख नफा झाला असून चालूवर्षी देखील सभासदांना १४ टक्के लाभांश जाहिर करण्यात आला. संस्थेला सतत प्रगतीपथावर ठेवण्यास प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष हातभार लगला आहे या सर्व सभासद ग्राहकांचे व सर्व कर्मचा-यांचे त्यांनी आभार मानले.

सभेला प्रमुख पाहुणे म्हणून पॅरीश प्रिस्ट फा. मिलेट उपस्थित होते. सभेच्या सुरवातीला फा. मिलेट यांनी प्रार्थना केली. त्यानंतर सभासदांच्या पाल्यांचा शैक्षणिक तसेच किडा क्षेत्रात विशेष प्राविण्य संपादन केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. त्यानंतर ईशप्रेमालया कोलगाव सावंतवाडी या कॅन्सर केंद्रामध्ये कोणत्याही जाती धर्माचा भेदभाव न करता कॅन्सर ग्रस्तांना मोफत उपचार दिले जातात, त्यांची योग्य ती काळजी घेतली जाते. म्हणून तेथील मा. सि. डेलिसा यांच्या आरोग्यसेवेची तसेच समाजसेवेची दखल घेऊन त्यांचा शाल, श्रीफळ व मानपत्र देऊन यथोचित्त सत्कार करण्यात आला. त्यानंतर सि. डेलिशा यांनी आपले मनोगत व्यक्त केले व सत्कार केल्याबद्दल संस्थेचे आभार मानले. फा. मिलेट डिसोजा यांनी आपले मनोगत व्यक्त करून संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सभेचे सर्व विषय अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात मंजर करण्यात आले. अहवाल वाचन सरव्यवस्थापक श्री जेम्स बॉर्जीस यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे व्हाईस चेअरम श्री रुजाय रॉड्रीक्स यांनी केले. सभेचे सुत्रसंचालन फॅन्की डॉन्टस यांनी केले.

You cannot copy content of this page