⚡कणकवली ता.२२-:
३८ व्या युवा वर्धापन दिनानिमित्त अनुभव शिक्षा केंद्र आणि साद टीम कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ते २९ या वयोगटातील युवकांसाठी जिल्हास्तरीय काव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार २८ ऑगस्ट, २०२२ रोजी कोकण गांधी आप्पासाहेब पटवर्धन यांच्या गोपुरी आश्रम येथे हे काव्यसंमेलन संपन्न होईल.
अनुभव शिक्षा केंद्रामार्फत युवा वर्गाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्त्वगुण विकास यासोबत जनजागृतीपर विविध शिबिरांचेही आयोजन करण्यात येते. मूल्याधिष्ठित समाज निर्मितीसाठी युवक युवतींसाठी विविध कार्यक्रम अनुभव शिक्षा केंद्राच्या वतीने सातत्याने महाराष्ट्रात राबविले जातात. संविधानिक मूल्यांच्या माध्यमातून युवकांमध्ये बदल घडवून आणण्यासाठी अनुभव शिक्षा केंद्र कार्य करते. युवा संस्था मागिल ३७ वर्षांपासून समाजातील विविध घटकांसोबत बदलाच्या प्रक्रियेमध्ये प्रयत्न करत आहे. साद टीम सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहे. तसेच ‘शोध स्वत्वाचा’ या उपक्रमांतर्गत विविध स्पर्धांचे, शिबिराचे आयोजन करण्यात येते. ३८ व्या युवा वर्धापन दिनानिमित्त यावेळी अनुभव शिक्षा केंद्र आणि साद टीम यांच्या संयुक्त विद्यमाने तरुणाईतील काव्य प्रतिभेला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी या काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. खाली दिलेल्या गूगल लिंकद्वारे काव्य संमेलनासाठी सहभाग नोंद करायचा असून प्रवेश मर्यादित आहे. सहभागी सर्व कवींना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येईल. अधिक माहितीसाठी अनुभव शिक्षा केंद्रचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रशिक्षक सहदेव पाटकर ९७६४९०२१६७ आणि साद टीम समन्वयक श्रेयश शिंदे ९४०४९१७८१४ यांच्याशी संपर्क साधावा.असे आवाहन करण्यात आले आहे.
