मालवण दि (प्रतिनिधी)
वंदे मातरम, भारत माता की जय अशा घोषणा देत आज मालवणात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त राष्ट्रीय काँग्रेस पक्षा मार्फत आजादी गौरव पदयात्रा काढण्यात आली. यावेळी देशभक्तीपर गीतानी वातारण उल्हसित झाले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात या पदयात्रेची सुरवात महात्मा गांधीनी केलेल्या मिठाच्या सत्याग्रहाचे ऐतिहासिक ठिकाण वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा येथून पदयात्रेची सुरवात करण्यात आली होती. आज ही पदयात्रा मालवण देऊळवाडा येथून काढण्यात आली. पदयात्रेत तिरंगा डौलाने फडकत होता. त्याच बरोबर याद करो कुर्बानी असे लिहिलेल्या फलकावरील महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरु,सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, भगतसिंग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लालबहादूर शास्त्री अश्या अनेक स्वातंत्र्य सेनानीच्या फोटोमुळे स्वातंत्र्य चळवळीच्या आठवणीना उजाळा मिळाला.
ही पदयात्रा देऊळवाडा – बस स्टॅण्ड – भरड मार्गे बाजारपेठेत आली असता सर्व व्यापारी वर्गाने उभे राहून तिरंग्याला अभिवादन केले. ही पदयात्रेत फोवकांडा पिंपळ येथे देश भक्तीपर नारे देऊन व जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांच्या भाषणाने उपस्थित जनमानसाना संबोधित करण्यात आले.
या पदयात्रेत सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख, प्रदेश प्रतिनिधी साईनाथ चव्हाण, तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी, पदाधिकारी अरविंद मोंडकर, ओबीसी जिल्हाध्यक्ष बाळु अंधारी, सेवादल जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, संदेश कोयंडे, आप्पा चव्हाण, सरदार ताजर, महेंद्र मांजरेकर, शहर अध्यक्ष जेंम्स फर्नांडिस, महिला शहराध्यक्ष गीता नेवाळे, शोभना चिंदरकर, चेतना होडवडेकर, सौ. सुर्वे, योगेश्वर कुर्ले, अमृत राऊळ, पपु माणगांवकर, बाबा मेंडीस, लक्ष्मीकांत परुळेकर, गणेश पाडगावकर, हेमंत माळकर, श्रेयस माणगावकर, मधुकर लुडबे व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
