कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर : सावंतवाडीतील नागरिकांच्यावतीने भव्य नागरी सत्कार
⚡सावंतवाडी ता.१३-: आयुष्यात मी कधीच कोणता पक्ष बदलला नाही किंवा कोणत्याही पक्षात बंडखोरी केली नाही. त्यामुळेच मला माझ्या मतदारसंघातील जनतेने तब्बल तीन वेळा आमदार केले. माझा पराभव करण्यासाठी विरोधी पक्षातील अनेक दिग्गज नेते सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ठाण मांडून असताना देखील त्यांच्याशी संघर्ष करून आमदार होऊन देखील ज्यावेळी मला देण्यात आलेले आश्वासन पाळण्यात आले नाही. त्यामुळेच मी पुढची भूमिका घेतली असे मत कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांनी आज सावंतवाडी येथे आयोजित मेळाव्यात व्यक्त केले आहे.
यावेळी मला मिळालेल्या मंत्रिपदाचा उपयोग जिल्ह्याच्या विकासासाठी करत येथील शेतकरी, मच्छीमारांचा विकास करणार असा शब्द देखील त्यानी यावेळी दिला आहे. यावेळी सावंतवाडीच्या नागरिकांच्या वतीने त्यांचा भव्य असा नागरी सत्कार करण्यात आला.
