⚡सावंतवाडी ता.११-: रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर समर्थक महिला कडून पोलिसांना राखी बांधण्यात आली. रक्षाबंधन हा पवित्र सण कुटुंबीयांसोबत साजरा करणे पोलिसांना शक्य नसल्याने आमदार दिपक केसरकर समर्थक महिलाकडून हा कार्यक्रम करण्यात आला.
यावेळी भारती मोरे,गीता सुकी, शिवाणी पाटकर, सायली होडावडेकर, पुजा नाईक, भारती परब,सुपिया गावडे, निता सावंत आदी उपस्थित होते.
