आचरा तिठा येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई

मालवण दि प्रतिनिधी

आचरे येथून देवगडच्या दिशेने बेकायदेशीररीत्या वाळूची वाहतूक करणाऱ्यां एका डपंरवर आज महसूल विभागाच्या पथकाने आचरा तीठा येथे धडक कारवाई करीत ताब्यात घेतलेला डंपर आचरा पोलिसांच्या ताब्यात दिला आठवड्या भरात सहा डपंरवर महसूल विभाग कडून कारवाई करण्यात आल्याचे महसूल कडून सांगण्यात आले.

गुरुवारी सकाळी महसूलचे पथक फिरत असताना ही कारवाई करण्यात आली यावेळी पथकात महसूल आचराचे मंडळाधिकारी अजय परब, तलाठी आचरा अनिल काळे पोलीस पाटील विठ्ठल धुरी, सुनील त्रिंबककर, कोतवाल गिरीश घाडी कारवाईत सहभागी झाले होते.

आचरा मालवण मार्गावरून वाळू घेऊन जात असलेला डंपर (MH 07 C 5043) आचरा तिठा येथे आढळुन आला असता या पथकाने पास विचारला असता पास नसल्याचे चालकाने सांगितले. सदर डंपर हा अनधिकृतपणे वाळू वाहतूक करत असल्याने डम्परवर कारवाई करत डंपर आचरा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

फोटो

बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर महसूलने कारवाई करत आचरा पोलीस ठाण्यात जमा केले

You cannot copy content of this page