कास येथील हरीनाम सप्ताह सोहळा संपन्न

⚡बांदा ता.११-: कास येथील श्री देवी माऊली मंदिरात वार्षिक अखंड हरिनाम सप्ताह सोहळा उत्साहात संपन्न झाला. पहिल्या दिवशी देवीची पूजाअर्चा झाल्यानंतर दुपारी भजनी पारांना सुरुवात झाली. यावेळी परंपरेनुसार पहिला पार मळीकर पंडीत, दुसरा दापटीकर पंडीत, तिसरा मळीवाडी, किनळेकरवाडी व देऊळवाडी, चौथा मुंडासबागवाडी, पाचवा कोल्हेभाटवाडी तर दुसर्‍या दिवशी सकाळी राणेवाडी ग्रामस्थांचा सहावा पार संपन्न झाला.

यावेळी वरचा मांगरवाडी व पंडीतवाडीतील ग्रामस्थांनी आकर्षक वेषभूषा करुन काढलेल्या आकर्षक दिंडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. दुपारी पूजन व आरती झाल्यानंतर नैवेद्य वाटप करण्यात आला. सार्वजनिक गार्‍हाणे झाल्यानंतर सोहळ्याची सांगता झाली. या सोहळ्यासाठी गोवा, मुंबईतील चाकरमान्यांसह गावातील ग्रामस्थ व महिला सहभागी झाल्या होत्या.

You cannot copy content of this page