सावंतवाडी शहरात नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी…

⚡सावंतवाडी ता.११-: शहरात नारळी पौर्णिमा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी प्रथेप्रमाणे राज घराण्याकडून देण्यात येणाऱ्या मानाच्या नारळाची संस्थानचे राजेसाहेब खेमसावंत भोसले व पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांच्या शुभहस्ते पूजा करून हा नारळ शेकडो सावंतवाडीकरांच्या उपस्थित तलावाला अर्पण करण्यात आला.

यावेळी येथील श्रीराम वाचन मंदिर परिसरातील मोती तलावाचा काठ नागरिकांच्या गर्दीने फुलून गेलेला होता .दरम्यान याहीवर्षी तलावात नारळ अर्पण करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी केली होती.

यावेळी युवराज लखमराजे भोसले,राजू बेग,दिलीप भालेकर,पोलिस कर्मचारी, शेकडो सावंतवाडीकर उपस्थित होते.

You cannot copy content of this page