⚡सावंतवाडी ता.११-: सावंतवाडी तालुका शिवसेना बांदा व इन्सुली जिल्हा परिषद मतदार संघाच्या उपतालुका प्रमुख पदी सुशांत पांगम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्ती पत्र जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी दिले आहे. शिवसेना सचिव विनायक राऊत आणि जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांच्या मार्गदर्शनानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेना बांदा व इन्सुली जिल्हा परिषद मतदार संघ उपतालुका प्रमुख पदी सुशांत पांगम यांची नियुक्ती
