वि. स. खांडेकर विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या वतीने रक्षाबंधन साजरी

माजी नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाडाला राखी बांधून रक्षाबंधन साजरी*

⚡सावंतवाडी ता.११-: वि स खांडेकर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी हरित सेना अंतर्गत झाडांचे संवर्धन व रक्षण करण्याच्या संकल्पनेतून झाडांना राखी बांधून विद्यार्थ्यांनी वेगळा संकल्प करून वृक्ष संवर्धनाची शपथ घेतली. यावेळी वृक्षास राखी बांधण्याचा कार्यक्रम भटवाडीत घेण्यात आला.

याप्रसंगी शाळेसाठी नेहमी सहकार्य करण्याची भूमिका घेणाऱ्या नगरसेविका सौ. दिपाली भालेकर, सामाजिक कार्यकर्ते दिलीप भालेकर, बाळा कावळे व मुख्याध्यापक राजाराम पवार हरित सेना प्रमुख श्री परीट श्री कोळी, श्री धुमाळे ,, सौ घोगरे, यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.मुख्याध्यापक श्री पवार सर यांनी सर्वांचे आभार मानले

You cannot copy content of this page