मोकाट जनावरांचा वेळीच बंदोबस्त करा

अन्यथा मनसे आंदोलन करणार

देवगड ता.११-:
देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील मोकाट गुरांचा वावर दिवसेंदिवस वाढत असून ही मोकाट गुरे रात्रीच्या वेळी गटागटाने भर रस्त्यात ठाण मांडून बसलेली असतात .प्रसंगी वारंवार नगरपंचायतीच्या घंटागाडीवरून गुरे मालकांना सूचना देऊनही मालकांकडून कोणत्या प्रकारची दखल घेतली जात नाहीत. या मोकाट गुरांचा रस्त्यामधील कायमस्वरूपी फिरण्यामुळे छोटे-मोठे अपघात होत असून या मोकाट गुरांचा बंदोबस्त नगरपंचायतीमार्फत वेळीच केला गेला नाही. तर मनसे मार्फत आंदोलन छेडण्यात येईल

व ही मोकाट गुरे स्वतः मनसे आपल्या ताब्यात घेऊन त्याची विक्री करेल. त्याचबरोबर रस्त्यावर रस्त्यावरील पथदिवे बहुतांशी बंदा अवस्थेत असून त्यामुळे रात्रीच्या वेळी प्रसंगी मोकाट गुरांच्या फिरण्यामुळे दुचाकी स्वार अथवा चारचाकी स्वार यांनाही काळोखात प्रसंगी पादचाऱ्यांना रस्त्यातून चालताना कोणताही अंदाज येत नाही. त्यामुळे अचानकपणे ती गुरे अंगावर धावून येतात तरी या गुरांचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा. त्याचबरोबर बंद असलेले असलेले पथदीप, (स्ट्रीट लाईट) नगरपंचायतीमार्फत वेळी सुरू करण्यात यावेत.ते वेळीच सुरू न झाल्यास बंद असलेल्या स्ट्रीट लाईट खाली मेणबत्ती पेटवून अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात येईल. असा इशारा देवगड तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने लेखी पत्राद्वारे देवगड जामसंडे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी कौस्तुभ गव्हाणे यांच्याकडे देण्यात आला आहे. यावेळी तालुका अध्यक्ष चंदन मेस्त्री उपाध्यक्ष महेश नलावडे, सरचिटणीस जगदीश जाधव, शहर अध्यक्ष सचिन राणे वन्य उपशहर अध्यक्ष गणेश सागवेकर व अन्य उपस्थित होते

You cannot copy content of this page