चीपटेवाडी येथे वन्य प्राण्यांपासून संरक्षण मिळण्यासाठी तारेचे कंपाऊंड घाला

बाबू सावंत, दिनेश सावंत यांची वन अधिकाऱ्यांकडे मागणी

⚡सावंतवाडी ता.११-: माजगाव चिपटेवाडी येथील भात पिकांची वन्य प्राण्यांकडून होणारी नुकसानी लक्षात घेता खाजगी आणि जमिनीच्या मध्ये बुरुज लाईनला तारेचे कंपाउंड उभारा अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य बाबू सावंत यांच्यासह सरपंच दिनेश सावंत व ग्रामस्थांनी सावंतवाडी वनक्षेत्र अधिकारी मदन क्षीरसागर यांच्याजवळ निवेदनाव्दारे केली.

सावंतवाडी तालुक्यात सध्या वन्यजीवांकडून भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे. माजगाव चिपटेवाडी येथे असलेल्या वनविभागाच्या हद्दीतील वन्य प्राण्यांकडून नजीकच्या भात शेतीची मोठ्या प्रमाणात नुकसानी सुरू आहे. या ठिकाणी असलेले पूर्वीचे तारेचे कंपाउंड नष्ट झाल्यामुळे वन्य प्राणी भात शेतात सहज येतातगेले कित्येक वर्ष हा प्रकार सुरू आहे त्यामुळे शेतकरी वर्ग हैराण झाला असून या ठिकाणी तारेच्या कुंपणाची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली ही मागणी लक्षात घेता आज माजी पंचायत समिती सदस्य श्रीकृष्ण उर्फ बापू सावंत सरपंच दिनेश सावंत यांच्यासह ग्रामस्थ सदाशिव गावडे शिवराम वराडकर सुनील वराडकर वैभव चौगुले दत्ताराम वराडकर भरत गावडे यांनी सावंतवाडी वनक्षेत्र अधिकारी श्री क्षीरसागर यांची भेट घेतली व निवेदन सादर केले.

You cannot copy content of this page