स्वच्छता विषयक जनजागृतीसाठीच्या रॅलीचे कणकवली प. स.ने केले स्वागत

⚡कणकवली ता.११-: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतर्फे तळेरे ते ओरोसपर्यंत स्वच्छता विषयक जनजागृती करण्यासाठी दुचाकी रॅली काढण्यात आली. या रॅलीचे कणकवली तालुक्यात ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले. या रॅलीचा शुभारंभ तळेरे येथे जि. प. चे मुख्याधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, कणकवली प.स.गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, सुनील पांगम ,श्री.पालकर,यांच्यासह पं. स. समितीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. तळेरे येथून ही रॅली कणकवली शहराच्या दिशेने रवाना झाली. या रॅलीचे नांदगाव,

बेळणे, हुंबरट, जानवली, कलमठ, वागदे, ओसरगाव याठिकाणी त्या-त्या गावाच्या सरपंच, ग्रा.प. सदस्य व ग्रामसेवकांनी स्वागत केले. जानवली याठिकाणी विद्यार्थ्यांनी सामूहिक राष्ट्रगित म्हणून रॅलीचे स्वागत केले. ही रॅली कलमठ महाजनीनगर येथे आली असता कलमठच्या सरपंच धनश्री मेस्त्री व ग्रा.प. सदस्यांनी सीईओ प्रजित नायर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांचा सत्कार केला. यावेळी ग्रा.पं.सदस्य संदीप मेस्त्री, उपसरपंच वैदेही गुडेकर, माजी जि.प.सदस्य स्वरुपा विखाळे, विनायक मेस्त्री, राजू राठोड, विलास गुडेकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. याप्रसंगी कलमठ ग्रा. पं. च्या स्वच्छतादुतांचा सीईओ प्रजित नायर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर ही दुचाकी रॅली कणकवली पंचायत समिती येथे दाखल झाले. या रॅलीचे याठिकाणी अधिकारी व कर्मचारी वर्गाकडून स्वागत करण्यात आले. यावेळी सीईओ प्रजित नायर यांच्या हस्ते माजी सैनिक अशोक कदम यांचा सत्कार केला. त्यानंतर ही रॅली ओरोसच्या दिशेने रवाना झाली. या रॅलीद्वारे स्वातंत्र्य अमृत महोत्सवात नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.

You cannot copy content of this page